परतावा धोरण
ऑनलाइन कार्यशाळा आणि कोर्सच्या नोंदणीसाठी खालील परतावा नियम लागू आहेत.
१. आगाऊ रक्कम (जागा राखण्यासाठी)
- आगाऊ भरलेली रक्कम (मराठी ऑनलाइन कार्यशाळा ₹1,000; लोणावळा निवासी कार्यशाळा ₹2,000) ही जागा राखण्याची (booking) रक्कम आहे. ती परत केली जात नाही.
- ही रक्कम पुढच्या batch ला वळवता येते.
- आगाऊ रक्कम भरणे म्हणजे प्रवेश निश्चित झालेला नाही; प्रवेश पूर्ण फी भरल्यावरच निश्चित होतो.
२. पूर्ण फी भरल्यावर रद्द करणे
- कार्यशाळा सुरू होण्याच्या ४८ तास आधीपर्यंत रद्द केल्यास आगाऊ रक्कम वगळून उरलेली रक्कम परत केली जाते.
- कार्यशाळा सुरू झाल्यावर परतावा दिला जात नाही.
- रेकॉर्डिंग किंवा अभ्यास-साहित्य मिळाल्यानंतर परतावा दिला जात नाही.
३. परतावा कसा आणि कधी
- परतावा मूळ पेमेंट पद्धतीनेच (UPI/कार्ड/बँक) केला जातो.
- मंजुरीनंतर साधारण ७ दिवसांत रक्कम खात्यात जमा होते.
४. आम्ही कार्यशाळा रद्द केल्यास
- आमच्याकडून कार्यशाळा रद्द किंवा पुढे ढकलली गेल्यास तुम्हाला पूर्ण परतावा किंवा पुढच्या batch चा पर्याय दिला जाईल.
५. रद्द करण्यासाठी
WhatsApp वर संपर्क करा: 91375 86703 (नाव आणि भरलेल्या मोबाईल नंबरसह), किंवा ईमेल: rajeshchavan444@gmail.com.